Categories
सरकारी योजना

बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5 हजार रुपये : PM Internship Scheme 2024

PM Internship Scheme 2024 :

पीएम इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme 2024) ही भारत सरकारने सुरू केलेली एक उल्लेखनीय उपक्रम आहे.पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएमआयएस) साठी नोंदणी सुरू झाली असून या १२ महिन्यांच्या कार्यक्रमांतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी सक्षम केले जाणार आहे. या योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget) या योजनेची घोषणा केली होती. पुढील 5 वर्षात तब्बल 1 कोटी तरुणांना या योजनेचा फायदा होईल. या योजनेत इंटर्ननं महिला 5000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर एक वर्ष पूर्ण केल्यानंतर सरकारकडून वेगळे 6 हजार रुपये देण्यात येतील.

पीएम इंटर्नशिप योजना मोदी सरकारकडून अधिकृत वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आली आहे. ही योजना काय आहे? त्यासाठी कसा अर्ज करायचा? कोणती योग्यता आवश्यक आहे ? तसंच यामध्ये काय सूविधा मिळणार आहेत ते पाहूया..

PM Internship Scheme 2024 : Last date to apply : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी (PMIS) नोंदणी १० नोव्हेंबर २०२४ रोजी बंद होईल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘www.pminternship.mca.gov.in’ या अधिकृत पोर्टलद्वारे अर्ज व्यवस्थापित केले जातील.

अर्ज कसा करायचा ते खाली देण्यात आले आहे:

१. पीएम इंटर्नशिप स्कीम पोर्टलला भेट देऊन अधिकृत पोर्टलवर जा.

२. खाते तयार करा. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुमची माहिती भरा.

३. तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पार्श्वभूमीविषयीचा तपशील भरा.

४. उपलब्ध असलेल्या इंटर्नशिप बघा. विविध कंपन्यांद्वारे विविध क्षेत्रांतील इंटर्नशिप ब्राउझ करा.

५. तुम्हाला स्वारस्य असलेल्या इंटर्नशिपसाठी अर्ज करा.

६. तुमच्याकडे आधार कार्ड असेल याची खात्री करा. नोंदणीसाठी तुमचा आधार क्रमांक अत्यावश्यक आहे.

७. अर्ज भरल्यानंतर एकदा तपासा. अर्ज केल्यानंतर अर्जाच्या स्थितीची माहिती घेत राहण्यासाठी नियमितपणे पोर्टल तपासत राहा.

विशेष म्हणजे, या योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणतीही नोंदणी किंवा अर्ज शुल्क नाही. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे, एक रेझ्युमे आपोआप तयार होईल, जो तुम्हाला तुमच्या प्राधान्यांच्या आधारावर पाच इंटर्नशिपच्या संधींसाठी अर्ज करण्याची अनुमती देईल, असे ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तात देण्यात आले आहे.

Criteria for PM Internship Scheme 2024 :

१. अर्जदार भारतीय नागरिक असावा.

२. अर्जदाराचे वय २१ ते २४ यादरम्यान असले पाहिजे.

३. अर्जदार पूर्ण वेळ रोजगार किंवा पूर्णवेळ शिक्षण घेणारा नसावा. ऑनलाइन कोर्सेस किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेणाऱ्या युवा व्यक्ती अर्ज करू शकतात.

४. इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्जदारांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे. तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा पूर्ण केलेला असायला हवा. किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

Documents required for PM Internship Scheme 2024 : नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पोर्टलवर नोंदणीसाठी उमेदवारांकडे खालील कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (अंतिम परीक्षा किंवा मूल्यांकन प्रमाणपत्रे)
  • अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (पर्यायी)

कागदपत्रांच्या कोणत्याही अतिरिक्त पुराव्याची आवश्यकता नाही.

Exit mobile version