Categories
नोकरी / Job

एलोन मस्क यांच्या कंपनीत भारतीय शिक्षकांची भरती : Elon Musk Hiring Hindi and English Tutors From India

एलोन मस्क यांच्या कंपनीत भारतीय शिक्षकांची भरती :

टेस्टला चे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क भारतातून हिंदी आणि इंग्रजी शिक्षकांची भरती करत आहे.(Elon Musk Hiring Hindi and English Tutors From India) हा जॉब इलोन मस्कच्या एक्स एआय (xAI) कंपनीसाठी आहे. 

हा जॉब कशा प्रकारचा असेल ? (Role of  AI Tutor) Elon Musk Hiring Hindi and English Tutors From India

यात एआय ट्यूटर (AI Tutor) म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी शिक्षकास एआय मॉडेल्स सुधारण्यासाठी उच्च दर्जाच्या लेबल केलेला डेटा तयार करावा लागेल. यात हिंदी भाषेसह अनेक भाषांमध्ये डेटा तयार करावा लागेल.

या डेटासह एआय सिस्टम भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.यासह वापरकर्ते चॅटबोट आणि एआय लेखन सहाय्यक म्हणून देखील वापरण्यास सक्षम असतील. 

एआय ट्यूटरला कंपनीच्या तांत्रिक टीम सोबत काम करावे लागेल आणि एआयच्या डेट्यानुसार गरजेनुसार डेटा व्यवस्थापित करावा लागेल.

एआय ट्यूटरला एआय सिस्टमला दिलेल्या डेटा ची गुणवत्ता उच्च पातळीची आहे याची खात्री देखील करावी लागेल. 

या नोकरीसाठी आवश्यक पात्रता : (Eligibility criteria) Elon Musk Hiring Hindi and English Tutors From India

जर तुम्हाला लेखन किंवा पत्रकारितेशी संबंधित अनुभव असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

तसेच तुमचे संशोधन कौशल्य ही चांगले असेल,तर या सिस्टम सुधारण्यासाठी भविष्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषा येणे आवश्यक आहे.विविध स्त्रोत, डेटाबेस आणि ऑनलाइन संसाधने नेव्हिगेट करण्याची क्षमता देखील असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठी पगार किती असेल ? (Salary for AI Tutor)

xAI मध्ये ट्यूटरच्या भूमिकेत काम करणाऱ्यांना 35-65 डॉलर प्रति तास (अंदाजे 5,500 रुपये प्रति तास) पगार मिळेल.

 

Exit mobile version