Categories
तंत्रज्ञान / Technology

Royal Enfield : First Electric Bike 2024 – रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक

Royal Enfield : First Electric Bike 2024 – रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक

Royal Enfield First Electric Bike : रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) ही दुचाकी निर्माती कंपनी भारतीय बाजारात उत्तम कामगिरी करत आहे.  रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या ऑटोमोटिव्ह शो EICMA-2024 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल रिव्हील केली आहे. कंपनीने चेन्नईतील (Chennai) त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये (Manufacturing Plant) इलेक्ट्रिक बाईकसाठी लागणारे धोरण, त्याची चाचणी घेण्यावर चर्चा आणि प्रयोग सुरू केले आहेत. तर, पुरवठा साखळी (Supply Chain) विकसित करण्यासाठी आणि नेटवर्क वाढवण्यासाठी कंपनीने गुंतवणूक सुरू केली आहे.

Royal Enfield : First Electric Bike : Launch Date of Flying Flea C6

कधी होणार लाँच ? रॉयल एनफिल्डने हेदेखील उघड केले आहे की, फ्लाइंग फ्ली (Flying Flea) एक प्लॅटफॉर्म आहे जी रॉयल एनफिल्डची नवीन उपकंपनी आहे आणि ते त्यावर आधारित आणखी इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करतील. फ्लाइंग फ्ली सी6 ची विक्री मार्च 2026 पर्यंत सुरू होईल, त्यासोबत हिमालयन ईव्ही देखील लॉन्च केली जाऊ शकते. तर S6 वर्षानंतर लॉन्च होऊ शकतो.

Specification of Flying Flea C6 :

वैशिष्ट्ये : बाईक ॲल्युमिनियम फ्रेमवर बांधली गेली आहे, ज्याचा उद्देश बाइक हलकी आणि अधिक चपळ आणि हाताळण्यास सोपी ठेवण्याचा आहे. आरामदायी राइडिंगसाठी, त्याच्या सस्पेन्शन सेटअपमध्ये गर्डर फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.

बाईकवर गर्डर फॉर्क्सचा वापर रंजक आहे, कारण ते 30 आणि 40 च्या दशकातील बाइकवर आपण पाहत होतो. फ्लाइंग फ्ली ट्यूबलेस टायर्ससह 19-इंच अलॉय व्हीलवर चालते. ब्रेकिंग सेटअपमध्ये दोन्ही टोकांना ट्विन डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version