New GST Rates : जीएसटी परिषदेचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

New GST Rates : जीएसटी परिषदेचा हा निर्णय येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

केंद्र सरकारने जीएसटी परिषदेच्या (GST Council) 56 व्या बैठकीत बुधवारी (3 सप्टेंबर) रोजी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, दुसरीकडे चैनी किंवा लक्झरी वस्तूंवर अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

वस्तू आणि सेवा कर (Goods and Service Tax) म्हणजे जीएसटी संदर्भात मोठ्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी दरात कसा बदल करण्यात आला ? (Changes in GST Rates) New GST Rates

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जीएसटीमधील 12 टक्के आणि 28 टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे. म्हणजेच  5, 12, 18 आणि 28 टक्के अशा चार टॅक्स स्लॅबऐवजी फक्त 5 आणि 18 टक्के अशा दोनच दरांना मंजुरी दिली आहे.

यापुढे जीएसटीचे 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच दर असणार आहेत.

नवे दर 22 सप्टेंबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील.

दैनंदिन वापराच्या वस्तूंवर बचत आधीचा GST नवीन GST
केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम 18% 5%
लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ 12% 5%
नमकीन, भुजिया, मिश्रण 12% 5%
भांडी 12% 5%
बाळांसाठी फीडिंग बॉटल्स, नॅपकीन, डायपर्स 12% 5%
शिवणयंत्र व पार्ट्स 12% 5%
शेतकरी व शेतीसाठी सवलत आधीचा GST नवीन GST
ट्रॅक्टर टायर्स व पार्ट्स 18% 5%
ट्रॅक्टर 12% 5%
जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषक घटक 12% 5%
ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर 12% 5%
शेती मशिनरी (जमीन तयारी, पेरणी, कापणी इ. 12% 5%
आरोग्य क्षेत्रातील दिलासा आधीचा GST नवीन GST
आरोग्य व जीवन विमा 18%
थर्मामीटर 12% 5%
ऑक्सिजन (वैद्यकीय वापरासाठी) 12% 5%
डायग्नोस्टिक किट आणि अभिकर्मक 12% 5%
ग्लुकोमीटर व टेस्ट स्ट्रिप्स 12% 5%
नंबरची चष्मे 12% 5%
शिक्षण अधिक परवडणारे आधीचा GST नवीन GST
नकाशे, चार्ट, ग्लोब्स 12%
पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल 12%
समान 12%
खोडरबर 5%
वाहने अधिक स्वस्त आधीचा GST नवीन GST
पेट्रोल-डिझेल हायब्रिड कार (1200 cc / 4000 mm) 28% 18%
डिझेल हायब्रिड कार (1500 cc / 4000 mm) 28% 18%
तीन चाकी वाहने 28% 18%
मोटारसायकल (350 cc पर्यंत) 28% 18%
मालवाहतूक मोटारगाडी 28% 18%
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत आधीचा GST नवीन GST
एअर कंडिशनर 28% 18%
टीव्ही (32 इंचापेक्षा मोठे, LED व LCD) 28% 18%
मॉनिटर व प्रोजेक्टर 28% 18%
डिश वॉशिंग मशिन्स 28% 18%

 

Leave a Comment