आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही,दंड होणार नाही.(No need to carry Driving Licence While Driving)

No need to carry Driving Licence While Driving :

अनेकदा आपण गाडी घेऊन घराबाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरतो आणि नेमकं त्याच वेळी आपल्याला वाहतूक पोलीस पकडतात. यानंतर मग आपल्याला दंड भरावा लागतो. पण आता तुम्हाला खिशात ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर तुमच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र नसेल आणि तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पकडले तर तुम्हाला चलान फाडण्याची किंवा दंड भरण्याची गरज नाही. यावेळी फक्त तुमच्याकडे हे दोन ॲप असणं गरजेचे आहे.पण, तुम्ही काळजी करु नका. आता डिजिलॉकर आणि एमपरिवहन अ‍ॅपवर कागदपत्रांची डिजीटल प्रतही वैध मानली जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

No need to carry Driving Licence While Driving : Law to avoid fine while driving : नियम वाचा आणि दंड टाळा

मोटार वाहन कायदा -1989 मधील दुरुस्तीच्या आधारे केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत बाळगण्याची गरज नाही. त्या ऐवजी तुम्ही ही कागदपत्रे एम परिवहन मोबाईल ॲप (mParivahan mobile app) मध्ये साठवून ठेवू शकता. किंवा डीजी लॉकर ॲप (Digilocker app)वापरू शकता.आता डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲपवर कागदपत्रांची डिजिटल प्रतही वैध मानली जाणार आहे,असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

No need to carry Driving Licence While Driving : How to use apps : ॲप कसे वापरावे.

mParivahan mobile app मध्ये आपले ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्याची सोपी प्रक्रिया खालील प्रमाणे :

स्टेप 1: सर्वप्रथम Google Play Store वरून एमपरिवहन अप (mParivahan mobile app) डाऊनलोड करा.

स्टेप 2: तुमचा मोबाइल नंबर वापरून साइन अप करा. त्यानंतर ओटीपी मिळाल्यावर ॲपवर नोंदणी करा.

स्टेप 3: आता, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत डीएल (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (नोंदणी प्रमाणपत्र).

स्टेप 4: तुमचा डीएल नंबर प्रविष्ट करा.

स्टेप 5 : व्हर्चुअल डीएल जनरेट करण्यासाठी, ‘Add to My Dashboard वर क्लिक करा.

स्टेप 6: जन्मतारीख प्रविष्ट करा आणि आपला डीएल आपल्या डॅशबोर्डमध्ये जोडला जाईल.

Leave a Comment